आरोग्य टिप्स - Kidney Health | किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. याव्यत...
आरोग्य टिप्स - Kidney Health | किडनी हा आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ती आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करते. जर आपली किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनीच्या समस्या वाढत आहेत. योग्य वेळी उपचार न केल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. किडनी निकामी होण्याची कारणे आणि हा धोका टाळण्यासाठी उपाय (Kidney Health) –
किडनी दोन कारणांमुळे निकामी होऊ
शकते
डॉक्टरांच्या
मते, किडनी
निकामी होण्याची दोन कारणे आहेत. पहिले एक्यूट किडनी फेल्युअर आणि दुसरे क्रॉनिक
किडनी फेल्युअर. एक्यूट किडनी फेल्युअर झाल्यास किडनीचे कार्य तात्पुरते थांबते.
त्यासाठी किडनी प्रत्यारोपण आणि डायलिसिसची गरज नाही. पण क्रॉनिक किडनी
फेल्युअरच्या बाबतीत किडनी हळूहळू खराब होऊ लागते. (Kidney
Health)
किडनी का निकामी होते?
बरेच
लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदना शामक औषधे, अँटीबायोटिक्स वापरतात
किंवा घेतात. त्यामुळे किडनी निकामी होऊ शकते. खराब जीवनशैली, मधुमेह आणि उच्च
रक्तदाब यामुळेही किडनी निकामी होऊ शकते.
मूत्रपिंड निकामी होण्याची
लक्षणे काय आहेत?
– लघवी कमी होणे
– लघवी करताना रक्तस्त्राव
– धाप लागणे
– खूप थकल्यासारखे वाटते
– उलटीसारखे जाणवते किंवा
उलटी होते
– छातीत दुखणे आणि दबाव
– हृदयविकाराचा झटका
किडनीचे नुकसान कसे टाळावे?
किडनी
खराब होऊ नये म्हणून वर्षातून किमान एकदा लघवी आणि रक्ताच्या चाचण्या कराव्यात.
धूम्रपान आणि दारू पिणे टाळा. सकस आणि पौष्टिक आहार घ्या. याशिवाय दररोज भरपूर
पाणी प्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत
नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या
कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक
आहे.)
COMMENTS