सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलीजन्स अँड मशीन लर्निंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच बी सी एस,बी बी ए,एम बी ए मध्ये शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने एज्यूब्रिज या फाऊंडेशन सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
या करारांतर्गत ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागामार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात येणार असून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
संस्थेच्या वतीने सचिव विवेक शेळके व एज्यूब्रिज च्या प्रोजेक्ट मॅनेजर सोनाली फुलसुंदर यांनी सदर करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा.राजीव सावंत, डॉ.लक्ष्मण घोलप आदि मान्यवर उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दोन टप्प्यात होणार आहेत पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा व कल चाचणी तर दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक कौशल्य, सांघिक चर्चा व वैयक्तिक ऑनलाईन मुलाखती घेतल्या जातील.
संभाषण कौशल्य, सॉफ्ट स्किल, जावा व फुल स्टॅक डेव्हलपर मधील तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये करण्यात येणार असून त्यासाठीचे मार्गदर्शन एज्यूब्रिज च्या माध्यमातून करणार असल्याचे प्रोजेक्ट मॅनेजर सोनाली फुलसुंदर यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रामध्ये पदवी अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये इंडस्ट्री ला आवश्यक असणारे शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी केले.
एज्यूब्रिज फॉउंडेशन च्या प्रोजेक्ट मॅनेजर सौ.सोनाली फुलसुंदर यांनी ट्रेनिंग व प्लेसमेंट साठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. सदर उपक्रमासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
एज्यूब्रिजच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी आभार व्यक्त केले.
COMMENTS