सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : सामाजिक कार्यकर्ते व वाचन चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ विज्ञान शिक्...
सहसंपादकः-
प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live :
सामाजिक कार्यकर्ते व वाचन चळवळ रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ
विज्ञान शिक्षक रतिलाल बाबेल यांना इनायत ब्लेसिंग फाउंडेशन, लखनऊ
(उत्तर प्रदेश) यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार आभा सी
पद्धतीने देण्यात आला अशी माहिती संस्थापक मानसी वाजपेयी यांनी दिली.
ग्रामीण भागामध्ये वाचन चळवळ रुजविणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने
गौरविण्यात येते. जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल वीस वर्षापासून ग्रामीण भागामध्ये
विज्ञान वाचन चळवळ रुजवण्याचे काम करत आहे. शिक्षकांचा भिशीच्या माध्यमातून जिल्हा
परिषदशाळेमधील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वैज्ञानिक पुस्तके मोफत
देत आहे. शिक्षकांमध्ये वाचन चळवळ रुजवण्यासाठी "लीलावती वाचन गटाची"
स्थापना केली आहे.
आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ जुन्नर तालुक्यातील शाळांना भारतीय
संविधानाची प्रत देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. 75 शाळांना संविधान प्रत दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक
दृष्टिकोन रुजविण्यासाठी माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांचे "ओवी
गाऊ विज्ञानाची" हे पुस्तक ते शाळांना भेट देत आहेत.
वाचन माणसाला समृद्ध बनवते. अपयशाला न घाबरता जिद्दीने कसे सामोरे
जायचे याचे ज्ञान वाचनातून मिळते. पुस्तके खरे मित्र असून संकट काळी धीर देण्याचे
काम पुस्तकातील विचार करतात. वाचनाने जगण्याची जिद्द निर्माण होते. योग्य वयात
योग्य वाचनाची सवय लावण्यासाठी बाबेल यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे.
या निवडीबद्दल त्यांचे तालुक्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले
तालुक्यातील अनेक तरुणांनी पुढे येऊन "वाचक
दूत" बनण्याची गरज असल्याचे मत रतिलाल बाबेल यांनी व्यक्त केले. पुरस्काराचे
स्वरूप सन्मान चिन्ह आणि सन्मान पत्र असे आहे. बाबेल ट्रस्टचे सर्व पदाधिकरी यांनी रतिलाल
बाबेल यांनी अभिनंदन करून पुढील
कार्यास शुभेच्छा दिल्या.
COMMENTS