सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : पुण्यश्लोक अहिल्यादेवी मा.शिक्षक-सेवक सह.पतसंस्था मर्या., नारायणगाव पतसंस्थेची २२ वी ...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : पुण्यश्लोक अहिल्यादेवी मा.शिक्षक-सेवक सह.पतसंस्था मर्या., नारायणगाव पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुक्ताई मंगल कार्यालय नारायणगाव येथे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रामचंद्र शेगर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, अशी माहिती पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन ज्ञानेश्वर केंद्रे यांनी दिली. सभेच्या सुरुवातीला पतसंस्थेचे मा.संचालक भास्करराव पानसरे,मा.संचालक शंकर निर्मळ आणि सभासद संजय कोकणे तसेच पतसंस्थेच्या काही सभासदांच्या अहवाल वर्षांतील दु:खद निधन झालेल्या ज्ञात अज्ञात नातेवाईक नातलगांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
पतसंस्थेची स्थापना सन २००० साली असून पतसंस्थेला सतत आॅडीट वर्ग अ मिळाला आहे.पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सभासदांच्या आर्थिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत . सन २०२० पासून जे सभासद नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले अशा सर्व सभासदांचा चांदीची गणेश मूर्ती,शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.पी.नरसुडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय.डी.इनामदार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विकास चव्हाण, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक आणि पतसंस्थेचे संचालक आर.बी.शिंदे आणि सेवानिवृत्त लिपिक साबळे मॅडम यांचा यावेळी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त सभासदांच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.पी.नरसुडे यांनी सत्काराला उत्तर देताना पतसंस्था सभासदांचे आर्थिक हित जोपासणारी संस्था असून पतसंस्थेला आॅडीट वर्ग अ मिळाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.तसेच पतसंस्थेचे कामकाज कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावर्षी पतसंस्थेला ८,५४,३८२ रु.नफा झाला असून पतसंस्था सभासदांना ८ टक्के लाभांश, सभेला उपस्थित सभासदांना उपस्थिती भत्ता आणि सर्व सभासदांना दिवाळीच्या निमित्ताने किराणा सामान भेट देणार असल्याचे चेअरमन रामचंद्र शेगर यांनी सांगितले.
या वेळी काशिनाथ आल्हाट, डी.बी.मानकर, एस.सी.पटेल, भानुदास चासकर, एस.आय.इनामदार, सुखदेव चासकर, एस.टी.लांडे, बाळासाहेब बारवेकर आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
या सभेला मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, मुख्याध्यापक भानुदास चासकर, पतसंस्थेचे माजी सचिव काशिनाथ आल्हाट आणि सभासद उपस्थित होते.सभेचे नियोजन चेअरमन रामचंद्र शेगर, व्हाइस चेअरमन ज्ञानेश्वर केंद्रे, सहसचिव पांडुरंग कडाळे, खजिनदार बबुशा खरात, संचालक भिमराव पालवे, संचालिका सुनंदा खाडे, संचालक रमेश शिंदे, संचालक गोरक्ष घोडे, संचालिका निर्मला नरसुडे, संचालक अरुण मातेले, संचालक बंडू सदामते आदिंनी केले.सहसचिव पांडुरंग कडाळे यांनी अहवाल वाचन केले तर संचालक अरुण मातेले यांनी आभार मानले. शेवटी सभासदांना सुरुची भोजनानंतर सभेची सांगता झाली.
COMMENTS