सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : आज उच्छिल येथे शालेय व्यवस्थापन समिती व समस्थ ग्रामस्थ आणि उच्छिल, शिवली व कालदरे ये...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : आज उच्छिल येथे शालेय व्यवस्थापन समिती व समस्थ ग्रामस्थ आणि उच्छिल, शिवली व कालदरे येथील सर्व शिक्षकवृंद यांच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच श्री. मंगेश नावजी आढारी व नवनिर्वाचित नूतन ग्रामपंचायत सदस्य श्री. सावकार नवले श्री. मारुती खिल्लारी व सौ. कांचनताई नवले यांचाही सत्कार समारंभ व सुंदर असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे श्री. बबन नवले उद्योजक, उच्छिल यांच्याही वतीने व्यासपीठ प्रदान करण्यात आले. तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांचीही मासिक सभा शालेय इमारत दुरुस्ती व इतर महत्वाच्या बाबींसाठी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.मंगेश आढारी लोकनियुक्त सरपंच ग्रुप ग्रामपंचायत, उच्छिल यांच्या विशेष प्रयत्नातून इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटीयम स्नेहल चोरडिया यांसकडून उच्छिल व कालदरे आणि शिवली शाळेस सहा डिझीटल व्हाईट बोर्ड भेट देऊन त्यांनी त्यांच्या राजकिय कारकिर्तीचा श्रीगणेशा केला व शैक्षणिक विविध उपक्रम बांधकाम व मुलांची प्रगती पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला व सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात माझ्या या तिनही शाळा पुर्णतः डिझीटल करून अधिकाधिक निधी शाळेसाठी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक श्री. अन्वर सय्यद यांस जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व नुतन ग्रामपंचायत यांच्या वतीने सरपंच यांनी सत्कार केला. तसेच स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव यामध्ये गाव शाळा तसेच तालुक्यात अतिउत्कृष्ट काम केल्याबद्दल जुन्नर तालुक्याचे युवा कार्यकुशल आमदार अतुलशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली श्री. सुभाष मोहरे यांचेही अभिनंदन करण्यात आले. या दरम्यान मनोगते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शरद नवले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री. मारुती खिल्लारी सौ. अश्विनी साबळे ग्रामसेविका, तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री. आत्माराम शिंदे यांनी केले तर कार्यक्रमासाठी उच्छिल गावचे पोलीस पाटील श्री. सुनिल बगाड शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. गणपत भालेराव शिक्षणप्रेमी सदस्य श्री. रामदास नवले सदस्य श्री संपत नवले सदस्या सौ. रेश्मा केंगले, सौ. शोभा नवले सौ. सविता नवले सौ. कांचन नवले सौ. विमल करवंदे श्रीम. नूतन साबळे, श्री. प्रवीण आढारी श्री. विलास आढारी आदी सदस्य तसेच कालदरे शाळेचे उपशिक्षक श्री. सागर भवारी व शिवली शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम भालेकर उच्छिल शाळेतील सौ. स्मिता ढोबळे, आरती मोहरे, सौ. लिलावती नांगरे हे सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते गावातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS