सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट,धोलवड( पुणे )यांचे वतीने ऑनलाइन राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट,धोलवड( पुणे )यांचे वतीने ऑनलाइन राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. घरगुती पर्यावरण पूरक गणपतीचे हे नऊ वे वर्ष असून या वर्षीच्या रांगोळी स्पर्धेत सामाजिक संदेश देणारे विषय मुलगी वाचवा, रक्तदान, झाडे वाचवा, वसुंधरा वाचवा, व्यसनमुक्ती, जल हेच जीवन, यासारखे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.
निकाल देताना चित्रकलेतील जाणकार व्यक्ती व व्हाट्सअप आणि फेसबुकला रांगोळी पाठविल्यानंतर आलेले अभिप्राय व मित्रमंडळीचा अभिप्राय या सर्वांच्या नजरेतून निकाल देताना रंगसंगती, विषयाची व्याप्ती, अचूकता, शुद्धलेखन यासारख्या अनेक मुद्द्यांचा विचार करून निकाल देण्याचा प्रयत्न केला आहे. रांगोळी काढण्यासाठी सहभागी स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आहे, याची जाणीव ठेवून स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आलेल्या रांगोळ्यांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकांना पाठवून त्यांच्याकडून आलेल्या अभिप्रायानुसार निकाल पुढीलप्रमाणे केला आहे. जेष्ठ चित्रकार सुनील रोकडे सर यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली परीक्षण केले.यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व ई- प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .
खुल्या गटातील स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक :(विभागून )
सौ तृप्ती अमित सोळंकी, नाशिक.,
सौ. सारिका आनंद अंबरखाने, नारायणगाव.
द्वितीय क्रमांक :(विभागून)
कु. देशमुख निकिता रामेश्वरम, जालना
श्री. प्रदीप रंगनाथ सूर्यवंशी, ओतूर
तृतीय क्रमांक:( विभागून)
सौ. संजीवनी रोहित पडवळ, डोंबिवली
सौ. चैताली सचिन लोंढे, लिंगाळी ,ता. दौंड, जिल्हा :पुणे.
सौ.मेघा योगीराज अनंत, नारायणगाव
उत्तेजनार्थ :
सौ. राणी प्रवीण ताजने, जुन्नर
कु. वैष्णवी बजरंग कोऱ्हाळे , नारायणगाव
सौ. दीपा मुरूमकर, अहमदनगर
सौ . अनिषा अजित डोके, 14 नंबर, ता :जुन्नर, जिल्हा :पुणे.
या रांगोळी स्पर्धेचे नियोजन बाबेल ट्रस्टचे सचिव प्रा. रतिलाल बाबेल व सदस्य सौ. अक्षदा बाबेल यांनी केले.
COMMENTS