आरोग्य टिप्स : चिया बियांना ( chia seed) सुपरफूड म्हणून ओळखतात. चिया बियांमध्ये फायबर , अँटिऑक्सिडंट्स , कॅल्शियम आणि लोह यांसारखे घटक असत...
आरोग्य टिप्स : चिया बियांना (chia seed) सुपरफूड म्हणून ओळखतात. चिया बियांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि लोह यांसारखे घटक असतात. तसेच चिया बिया चवहीन असतात. चिया बियांना कच्चे न खाता भिजवून, भाजून अथवा इतर पेय, पदार्थांमध्ये त्याचा वापर करून सेवन करावे. जाणून घ्या चिया बिया खाण्याचे फायदे –
त्वचेचे आरोग्य सुधारते (Improves
skin health)
चिया
बियांमध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे त्वचा नितळ, चमकदार आणि अधिक तरुण बनते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Useful for
weight loss)
जेव्हा
तुमची पचनक्रिया योग्य असते, तेव्हा तुम्ही अन्न जलद पचवू शकता. चिया बियांमध्ये भरपूर
फायबर आणि प्रथिने असतात. ज्याच्या सेवनाने पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि वजन जलद
कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल कमी करते (Lowers
cholesterol)
चिया
बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला डिटॉक्स करतात आणि
शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकतात. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण
संतुलित राहते. चिया बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित समस्या
कमी होण्यास मदत होते.
पोटाच्या समस्या कमी होतात (Stomach problems
are reduced)
चिया
बियांचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या यांसारख्या समस्या कमी होतात.
हाडे मजबूत बनतात (Bones become
strong)
चिया
बियांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
टीप : दिवसभरात चिया बियांचे 2 चमचेपेक्षा जास्त सेवन करू
नये. चिया बियांच्या अतिसेवनाने अपचन होऊ शकते. मधुमेह असणाऱ्यांनी चिया बियांचे
सेवन वैद्यकीय सल्ल्याने करावे.
COMMENTS