पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कोंढवा तपास पथकाने ०४ तासात जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. ०३/०८/२०२२ रोजी रा...
पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना कोंढवा तपास पथकाने ०४ तासात जेरबंद केले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
०३/०८/२०२२ रोजी रात्रौ ०८:०० वा. चे सुमारास शिवनेरीनगर, गल्ली नं. ११, रवी बिल्डींग समोर, भगवा चौक, कोंढवा खुर्द पुणे येथे पुर्वी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महेश लक्ष्मण गुजर (वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०८, मिताली कॉम्प्लेक्स, शिवनेरीनगर, गल्ली नं २६, कोंढवा खुर्द, पुणे) यास १) अमर कैलास गव्हाणे (वय ३४ वर्षे, रा गल्ली नं २४, आंबेडकर हॉल समोर, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द पुणे), २) राजकुमार लक्ष्मण पवार (वय २९ वर्षे, रा. गल्ली नं १४, भाग्योदयनगर, खान बिल्डींग शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे(, ३) कृष्णा गणेश मराठे (वय ३३ वर्षे, जय भवानी माता मंदिर शेजारी, गल्ली नं ०९, शिवेरीनगर, कोंढवा खुर्द पुणे), ४) सचिन विष्णु राठोड (वय २२ वर्षे, रा गल्ली नं १२, शिवेनेरीनगर, कोंढवा खुर्द पुणे) व ५) गणेश सिताराम हाके (वय २८ वर्षे, रा गल्ली नं. १८, मोगल हॉल शेजारी, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांनी पालगनने डोक्यात वार करून त्याचा निर्घुन खुन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा कोंढवा तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व टिम मधिल सहकारी शोध घेत असताना पोलिस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर व पोलिस अंमलदार/१०११६ ज्ञानेश्वर भोसले यांना त्यांचे गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा करून पळून जात असून ते उंडी-हांडेवाडी रोड येथे येणार आहेत. खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील यांनी स्टाफसह सदर ठिकणी जावून सापळा रचला. पळून जाणाऱ्या पाचही आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांना कोंढवा पोलिस स्टेशन येथे आणून त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकिस आणला आहे.
संबंधित कारवाई ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, नामदेव चव्हाण, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-५ नम्रता पाटील, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन सरदार पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, पोलिस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा/११६१ सतिश चव्हाण, पोना/७९ निलेश देसाई, पोना/७७८२ जोतिबा पवार, पोना/६९३१ तुषार आल्हाट, पो.अं./८५९१ लष्मण होळकर, पो.अ./१०११६ ज्ञानेश्वर भोसले व पो.अं./ ९८३८ संतोष बनसुडे यांच्या पथकाने केली आहे. कोंढवा पोलिस ठाण्याच्या सर्व पथकाचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS