सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रकल्प स्पर्धेत समर...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रकल्प स्पर्धेत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागामध्ये शिकत असलेला सौरभ एरंडे या विद्यार्थ्यांने तयार केलेल्या 'जी एस एम बेस हायवे स्पीड चेकर विथ ओवर स्पीड अलर्ट थ्रू मेसेज' या प्रकल्पाचा सदर ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक आल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली. तसेच समर्थ पॉलिटेक्निक मधील श्रावणी येंधे, अभिजित जगताप, सिद्धी सरोदे, अविनाश घुले यांनी तयार केलेल्या 'वायरलेस इलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशन'या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
जी एम आर टी खोडद येथे डॉ.जे के सोळंकी साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवउपक्रमशिलतेला वाव मिळण्यासाठी या प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या वर्षी देखील कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तज्ञ व्यक्तींनी मूल्यमापन केले.
ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजा ओळखून या प्रकल्पांचा वापर हा बहुपर्यायी म्हणून करता येतो.
सदर प्रकल्प तयार करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना प्रा.निर्मल कोठारी, प्रा.सचिन निकम, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.संजय कंधारे, प्रा.महेंद्र खटाटे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.
या संकुलातील विद्यार्थी नवनवीन समाजाभिमुख प्रकल्प तयार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS