आरोग्य टिप्स : तुकतुकीत आणि सुंदर तजेलदार त्वचा प्रत्येकाला हवी असते , पण त्यासाठी त्वचेची निगा राखणे Skin care आणि त्यात सातत्य राखणे गरज...
आरोग्य टिप्स : तुकतुकीत आणि सुंदर तजेलदार
त्वचा प्रत्येकाला हवी असते, पण त्यासाठी त्वचेची निगा राखणे Skin
care आणि
त्यात सातत्य राखणे गरजेचे असते. किशोरवयीन मुलांना पिंपल्सची समस्या होणे
स्वाभाविक आहे, पण वयात आलेल्यांनाच नाही तर
अनेक मध्यमवयीन लोकांनाही पिंपल्सची समस्या जाणवू लागते.
अनेकदा पिंपल्सची
समस्या प्रदूषण, धूळ-
माती, उष्णता, घाम आणि हार्मोन्समधील बदलांमुळे
होते. पण याशिवाय काही खाण्याचे पदार्थही असे आहेत ज्यांचा त्वचेवर नकारात्मक
परिणाम होतो. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी संतुलित आहार आणि त्वचेची देखभालही Skin care तेवढीच महत्वाची आहे.
आपण
जे काही खातो, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. अशा परिस्थितीत काही
अशा पदार्थांबद्दल जाणून घ्या, ज्यांचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो.
दुग्धजन्य पदार्थ जसे की चीज आणि दही, व्हे प्रोटीन/सोया प्रोटीन, शेंगदाणे, शेल फिश, मीठ, साखर, कँडी, ग्लूटेनयुक्त पदार्थ (उदा. ब्रेड, पास्ता), अल्कोहोल, सोडा आणि लाल मांस अशा काही
पदार्थांच्या सेवनाने काही लोकांना मुरुमांचा त्रास होऊ शकतो. विशेषतः उच्च
ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला तज्ञांनी दिला
आहे.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्स
असलेले पदार्थ म्हणजे साखरयुक्त पेये, पांढरा
ब्रेड, पांढरा तांदूळ इत्यादी. हेल्दी
प्रोटीन स्त्रोतांनी समृद्ध ताजी फळे आणि भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा आहारात
समावेश करा. सोबतच वर दिलेले पदार्थ रोजच्या आहारातून अचानक सोडून देणे शक्य नसले
तरी या पदार्थांचे सेवन नियंत्रण करायला हवे.
COMMENTS