पुणेः शिरूर पोलिसांकडे एका महिलेने जबाब दिला होता. यानंतर कारागृहामधून बाहेर आलेल्या दोघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत...
पुणेः शिरूर पोलिसांकडे एका महिलेने जबाब दिला होता. यानंतर कारागृहामधून बाहेर आलेल्या दोघांनी महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यांनतर दोघांना कोठडी झालेली होती, सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात 'तू पोलिस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब का दिला? तुझ्यामुळे आम्हाला जेल मध्ये जावे लागले,' असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत जवळील कुऱ्हाडने मारहाण करत जखमी केले.
याबाबत दिपाली भावेश काळे (वय ३० वर्षे रा. तहसील कार्यालय जवळ शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी आपुरक्या उर्फ आप्पा शंकर भोसले व देवराम आप्पासाहेब भोसले (दोघे रा. जोशीवाडी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश शिंदे हे करत आहे.
COMMENTS