कोलकाता: एका ऑफिस पार्टीदरम्यान 30 वर्षीय महिलेवर तिच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पी...
कोलकाता: एका ऑफिस पार्टीदरम्यान 30 वर्षीय महिलेवर तिच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर भास्कर बॅनर्जी, चिरंजीब सूत्रधर आणि इंद्राणी दास या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
ऑफिस पार्टीदरम्यान आरोपींनी महिलेच्या ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कोलकात्यातील चिनार पार्कमधील पिनॅकल टॉवर या व्यावसायिक इमारतीच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर गेस्ट हाऊस आहे. शनिवारच्या पार्टीसाठी सहावा मजला बुक करण्यात आला होता, ज्यामध्ये तीन बेडरूम आणि एक लॉबी होती. महिलेच्या तक्रारीनुसार, या पार्टीत आठ जण सहभागी झाले होते. त्यापैकी सहा महिला होत्या, हे सर्व टेली-कॉलरच्या टीमचे सहकारी होते. पीडित महिला ही स्वतः बीपीओ एक्झिक्युटिव्ह असून इंद्राणी दास ही त्यांची टीम लीडर आहे, तर सूत्रधर आणि बॅनर्जी हे वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.
पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, 'पार्टी सुरू झाल्यानंतर सर्वांनी दारू पिण्यास सुरुवात केली. यावेळी इंद्राणी दास ही तिला एका खोलीत घेऊन गेली. यावेळी त्या खोलीत सूत्रधर आणि बॅनर्जी उपस्थित होते. ते सर्व मद्यपान करू लागले. काही वेळाने महिलेला तंद्री लागली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा ती बेडवर एकटीच नग्न अवस्थेत पडलेली होती. सहकाऱ्यांना बोलावले असता त्यांनी सांगितले की ती झोपली होती म्हणून ते निघून गेले. मात्र आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे त्या महिलेस कळाले होते. घाबरल्यामुळे तिने चार दिवस घरातच काढले. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेने केलेल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी वैद्यकीय-कायदेशीर चाचणी केली. आणि तक्रार दाखल केल्याच्या तासाभरात आरोपींना कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS