नवी दिल्लीः एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या पुरुषाला भेटण्यासाठी महिला हॉटेलवर गेल्यानंतर त्याने बलात्कार करून पळ काढल्याची घटना घडली आहे. या...
नवी दिल्लीः एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या पुरुषाला भेटण्यासाठी महिला हॉटेलवर गेल्यानंतर त्याने बलात्कार करून पळ काढल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 28 वर्षांच्या महिलेची मोहक गुप्ता नावाच्या पुरुषासोबत ऑनलाईन डेटिंग ॲपवर ओळख झाली. दोघे एकमेकांना 27 मे रोजी प्रथम भेटले होते. दोघांची मैत्री झाल्यानंतर त्याने महिलेला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. 30 मे रोजी ही महिला मोहकला भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये गेली होती. त्याने एक ड्रिंक प्यायला दिले. ड्रिंक प्यायल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटले आणि ती गुंगी आली. बेशुद्धावस्थेत असताना मोहकने तिच्यावर लैगिक अत्याचार केले. 31 मे रोजी तो महिलेला मेट्रो रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि तिला ट्रेनमध्ये बसवून गायब झाला.
मोहकला या महिलेने फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन लागत नव्हता. यानंतर पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी महिलेनं दिलेल्या वर्णनानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 376 (बलात्कार) आणि कलम 328 (विषबाधा) नुसार मोहक नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या द्वारका पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज पोलिस सध्या तपासत आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी महिलेला दिले आहे.
COMMENTS