सहसंपादक – प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : गुरुकुल प्रि स्कूल अँड ॲक्टिविटी सेंटर , सावरगाव ह्या स्कूल चे चालू शैक्षणिक वर्ष...
सहसंपादक – प्रा. प्रविण
ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : गुरुकुल प्रि स्कूल अँड ॲक्टिविटी सेंटर, सावरगाव ह्या
स्कूल चे चालू शैक्षणिक वर्ष दिनांक ६ जून
२०२२ पासून थाटामाटात सुरु झाले. कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे दोन वर्षाच्या गॅप
नंतर पुनश्च एकदा सावरगाव व पंचक्रोशीतील
ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थित उद्घाटन पार पडले. उपस्थित पालकांमधील प्रथम
उपस्थित होणारे पालक श्री. प्रशांत
क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन पार पडले. माननीय श्री. खरात गुरुजी
, श्री. पांडुरंग काका मनसुख व सर्व पालक यांच्या हस्ते
छत्रपती शिवाजी महाराज व श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम संपन्न
झाला.
गुरुकुल मध्ये
प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर के. जी. आणि सिनिअर के.जी. यासाठी प्रवेश देणे
सुरू आहे अशी माहिती गुरुकुल च्या प्राचार्या जयश्री शेटे मॅडम यांनी दिली आहे.
गुरुकुल उपक्रमशील स्कूल म्हणून नावारूपास येत असून येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण
मिळत आहे अशी माहिती पंचक्रोशीतील पालकांनी दिली आहे.
COMMENTS