वास्को (गोवा): एका नातेवाईकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला आहे. पीडीत मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानत...
वास्को (गोवा): एका नातेवाईकाने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार केला आहे. पीडीत मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजल्यानतंर कुटुंबियांना धक्का बसला.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित नातेवाईकाला (वय ३५) अटक केली आहे. बलात्कार करणारा मुलीच्या आत्याचा पती असल्याची माहिती चौकशीवेळी उघड झाली आहे.
दक्षिण गोव्यातील वास्को पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, पीडित मुलीच्या आईने तिच्या मुलीवर होणाऱ्या अन्यायाबाबत शुक्रवारी (दि.२७) रात्री ११ च्या सुमारास तक्रार नोंदवली. मुलीला बरे वाटत नसल्याने तिला घेऊन तिची आई रुग्णालयात गेली असता ती पाच महिन्यांची गर्भवती समजल्यानंतर मोठा धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्या मुलीच्या आत्याच्या पतीनेच तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचे उघड झाले. पीडित मुलीच्या मामाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादस ३७६(३) कलमाखाली तसेच गोवा बाल कायद्याच्या ८(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. शनिवारी (ता. २८) त्या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत मिळाली आहे. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS