सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बा...
सहसंपादक :- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल मार्फत नुकत्याच आयोजित केलेल्या "प्लेसमेंट ड्राईव्ह २०२२" अंतर्गत कॉम्प्युटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील २८ विद्यार्थ्यांची एल अँड टी डिफेन्स या तळेगाव दाभाडे येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये समर्थ पॉलिटेक्निक मधील कॉम्प्युटर, मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील २८ विद्यार्थ्यांची सदर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड करण्यात आल्याची माहिती कंपनीचे HR चे असिस्टंट मॅनेजर विलास पवार व डेप्युटी जनरल मॅनेजर प्रसाद चेंबूरकर यांनी दिली.
संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,सामान्य ज्ञान,विषयाबाबतचे तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केलेला आहे असे यावेळी कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर गोरखनाथ बाळशिराम औटी म्हणाले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे:
भाग्यश्री भालेराव, कांचन वैराळ, रोहित गाडेकर, हिंगडे प्रणाली, अभिषेक शिंदे, अजित भंडारी, सिद्धी सरोदे, कोमल राळे, श्रीराज धोत्रे, श्रावण आदक, अजय चौगुले, अभिजीत जगताप, ओमकार कड, कृष्णा डोंगरे, कृष्णा पोखरकर, अभिषेक तांबे, विकास भोर, घनश्याम फुले, वल्लभ घाडगे, सिद्धार्थ गायके, ऋषिकेश डोके, शुभम टेमगिरे, ईशान खानापूरकर, मयूर गाडगे, आशिष खटाटे, आयुष कोरडे, केशव म्हात्रे व फैसल मोमिन या २८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच ८ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असून त्यांची अंतिम यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे जनरल मॅनेजर गोरखनाथ औटी यांनी सांगितले.
सदर निवड प्रक्रिया जनरल मॅनेजर गोरखनाथ औटी डेप्युटी जनरल मॅनेजर प्रसाद चेंबूरकर, सचिन आवळे, असिस्टंट मॅनेजर विलास पवार, हर्षदा कलंत्री यांच्यामार्फत राबवली गेली. या प्लेसमेंट साठी विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे, प्रा.संजय कंधारे, प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर, प्रा.संकेत विघे, प्रा.संदीप त्रिभुवन, प्रा.सुनील रहाणे, प्रा.विशाल कांबळे, प्रा.राकेश तन्नू, प्रा.सोपान क्षीरसागर, प्रा.हुसेन मोमीन,प्रा.भाग्यश्री शेळके आदींनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS