पुणेः शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील निर्वी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...
पुणेः शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील निर्वी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबुराव माळवदकर (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बाबुराव माळवदकर यांनी उसने घेतलेले पैसे परत दिले असतानाही व्याज म्हणून अधिकच्या रकमेची मागणी करुन शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर बबन बाबुराव माळवदकर या शेतकऱ्यांने शुक्रवारी (ता. २०) गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा राहुल माळवदकर याने शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुनाट (ता. शिरुर) येथील गोरख सरोदे याच्या सह त्याची पत्नी व आईवर गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वी येथील बबन माळवदकर यांनी गुनाट येथील गोरख सरोदे याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. ते काही दिवसानंतर परतही केले होते. परंतु, गोरख सरोदे, त्याची पत्नी आणि आई हे तिघेही माळवदकर यांच्याकडे वारंवार त्या पैशाच्या व्याजाची मागणी करत होते. शिवाय, त्यांना शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून बबन माळवदकर यांनी शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.
COMMENTS