रायपूर (छत्तीसगड): दारूच्या नशेत असलेल्या बापाने 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्यानंतर त्याने मित्रांसोबत आपल्य...
रायपूर (छत्तीसगड): दारूच्या नशेत असलेल्या बापाने 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्यानंतर त्याने मित्रांसोबत आपल्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
सामूहिक बलात्कारानंतर पीडितेने तिच्या आजीला माहिती दिली. त्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पिता आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात हा आरोपी आपल्या तीन मुलांसह आणि वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. आरोपीच्या पत्नीचा 2019 मध्ये मृत्यू झालेला आहे. 28 एप्रिलला रात्री दारूच्या नशेत आरोपी त्याच्या दोन मित्रांसह आपल्या घरी आला. यावेळी त्याची तिन्ही मुले (एक 3 वर्षांचा, तर दुसरा 6 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी) झोपले होते.
आरोपीने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि तिला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन गेला. यानंतर त्याने मित्रांसोबत आपल्याच मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने आपल्या लहान भावांना तसेच आजीला याबाबत सांगितले. पीडित मुलगी जवळच्या गावात असलेल्या आपल्या आजीकडे तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आजीने नारायणपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पिता आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात 376 (घ) 376 (क,ख) पॉस्को कायदा 4,6,17 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
COMMENTS