क्राईमनामा Live : कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थीनी कु.स्वप्नाली सखाराम मांडवे हिने शिक्षणासाठी गोद्रे ते जुन्नर असा पायी प्...
क्राईमनामा Live : कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थीनी कु.स्वप्नाली सखाराम मांडवे हिने शिक्षणासाठी गोद्रे ते जुन्नर असा पायी प्रवास करून इ.११ वी मध्ये उत्तम यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अ़ॅड.संजय शिवाजीराव काळे साहेब यांनी तिला सायकल भेट देऊन तिच्या उज्ज्वल यशाचे कौतुक केले.
अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.आर.मंडलिक सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.लोढा म़ॅडम,कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.तांबे सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज दि.०५/०५/२०२२ रोजी या विद्यार्थीनीस सायकल प्रदान करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल विद्यार्थीनी कु.स्वप्नाली व तिच्या पालकांनी मा.अध्यक्ष साहेबांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.
COMMENTS