पुणेः वेल्डिंगच्या कामाचे पैसे मागितल्यानंतर 'तू मला दुपारी फोन का केला होता, तुला माज आला आहे का?' म्हणून जखमी केले. याबाबत गुन्ह...
पुणेः वेल्डिंगच्या कामाचे पैसे मागितल्यानंतर 'तू मला दुपारी फोन का केला होता, तुला माज आला आहे का?' म्हणून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
धामारी (ता. शिरूर) येथे महेश डफळ यांचे वेल्डिंगचे दुकान असून त्यांनी दुकानात केलेल्या कामाचे काही पैसे गावातील मिनीनाथ पावसे याच्याकडे होते. त्यामुळे डफळ यांनी फोन करून उधारीचे पैसे मागितले. रात्रीच्या सुमारास मिनीनाथ पावसे हे चारचाकी गाडीतून डफळ यांच्या दुकानासमोर आले आणि डफळ यांना 'तू मला दुपारी फोन का केला होता, तुला माज आला आहे का?' असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. यावेळी पावसे यांनी डफळ यांच्या दुकानातील हातोडा घेऊन महेश डफळ यांच्या डोक्यावर मारहाण करून जखमी केले.
याबाबत महेश शिवाजी डफळ (वय २८, रा. धामारी कापरे वस्ती ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी मिनीनाथ दत्तात्रय पावसे (रा. धामारी पावसे वस्ती ता. शिरूर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहेत.
COMMENTS