पाटणा (बिहार) : लग्न झाल्यानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरीने सॅंडलने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. यानंतर प्रकरण पोलिसांकडे ...
पाटणा (बिहार) : लग्न झाल्यानंतर हनिमूनच्या रात्रीच नवरीने सॅंडलने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले असून, याबाबत तपास करत आहेत.
या घटनेनंतर नवरी आपल्या आई-वडिलांसह नवरदेवाच्या घराबाहेर ठाण मांडून बसली आहे. पोलिस आणि स्थानिक नागरिक, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाटणा येथील एका सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या घराबाहेर त्यांची सून तिच्या आई-वडिलांसोबत दोन दिवसांपासून धरण्यावर बसली आहे. सुनेचा आरोप आहे की तिला सासरच्या घरी राहायचे आहे. पण, सासरचे लोक तिला घरात ठेवायला तयार नाहीत. सुनेसोबतच तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईकही धरण्यावर बसले आहेत. दुसरीकडे, निवृत्त रेल्वे अधिकारी विजय सिंह, त्यांची पत्नी चमेली देवी आणि मुलगा रोहित यांचा आरोप आहे की, सून आणि तिच्या कुटुंबीयांनी घराचे वीज कनेक्शन तोडले असून पाणीपुरवठा बंद केला आहे. याबातबत राजीव नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
स्मिताचे 2019 मध्ये रोहितसोबत लग्न झाले होते. स्मिताचा आरोप आहे की, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर सासरच्यांनी तिला जबरदस्तीने घराबाहेर काढले. वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी दिल्या आहेत. दुसरीकडे स्मिताच्या सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे की, हनिमूनच्या रात्रीच स्मिताने रोहितला सँडलने मारहाण केली होती. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. स्थानिक हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
COMMENTS