भोपाळ (मध्य प्रदेश) : लग्न झाल्यानंतर 72 तासांनंतर सासरच्या मंडळींना बेशुद्ध करून लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या नवरीला न्यायालयात हजर झाली...
भोपाळ (मध्य प्रदेश) : लग्न झाल्यानंतर 72 तासांनंतर सासरच्या मंडळींना बेशुद्ध करून लाखो रुपये घेऊन फरार झालेल्या नवरीला न्यायालयात हजर झाली आहे. तिने न्यायालयात चूक मान्य केली आहे.
याप्रकरणी महाकाय पोलिस पुढील तपास करत आहेत.
निकिता हिने सचिन तिवारीसोबत 19 मार्च रोजी चिंतामण मंदिरात लग्न केले होते. पण, लग्नाच्या 72 तासांनंतर नवरीने तिवारी कुटुंबाला दुधामधून नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले. यानंतर घरातून रोख, सोन्याचे दागिने घेऊन फरार झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी लग्नात सहभागी झालेले मुलीचे खोटे मामा विजय मुळे, भाऊ नारायण आणि ड्रायव्हर यांना पकडले होते. यादरम्यान मुख्य आरोपी असलेल्या नवरीला पकडण्यासाठी पोलिस तिच्या घरी पोहोचले होते. पण, ती सापडली नव्हती.
पोलिस तिचा शोध घेत असतानाच निकीता मंगळवारी दुपारी 3 वाजता विजय आणि नारायण या आपल्या नातेवाईकांसह तेथे पोहोचली आणि न्यायालयात हजर झाली. यानंतर पोलिसांनी निकीताला अटक करून, न्यायालयाच्या परवानगीनंतर तिला अटक करून 14 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS