आरोग्य टिप्स : किवी हे फळ आपल्याकडे आता बऱ्यापैकी प्रचलित झाले आहे. किवीमध्ये विविध पौष्टिक घटक तसेच लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्...
आरोग्य टिप्स : किवी हे फळ आपल्याकडे आता बऱ्यापैकी प्रचलित झाले आहे. किवीमध्ये विविध पौष्टिक घटक तसेच लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्हिटॅमिन सी आढळते. मात्र आपल्याकडे किवी हे फळ रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यावरच बहुतांशी खाल्ले जाते.
किवी या फळाचे नियमित सेवन करण्याचे इतरही असंख्य फायदे आहेत. जाणून घ्या किवी खाण्याचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे.-
१.रोग प्रतिकारशक्ती वाढते-
किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे किवी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते.
२.रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्यास मदत करते-
आपल्या शरीरातील कमकुवत पेशींना सुदृढ बनवण्याचे काम किवी करत असते. त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास किवी फळाचे सेवन करावे.
३.त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर-
व्हिटामीन सी आणि ई आपल्या शरीरात अँटिऑक्सिडेन्टसारखे काम करते त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्याही कमी होते, त्वचा सुंदर बनते. व्हिटॅमिन सी मुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. चेहऱ्यावरचे डाग कमी होऊन त्वचा चमकदार बनते.
४.केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर-
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असणारे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी किवीमध्ये आढळतात. किवीचे नियमित सेवन केल्याने केस गळती, केसांतील कोंडा, केसांची वाढ न होणे यांसारख्या समस्या कमी होतात.
५.पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते-
किवी फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे पचनतंत्र व्यवस्थित राहते.
६.मधुमेहाच्या समस्येवर गुणकारी-
किवी खाल्ल्याने रक्तात साखरेचे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी किवी अवश्य खावी.
७.जखम भरण्यास मदत करते-
किवीमध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ जखमेला लवकर भरून काढतात. जखम भरून काढण्यासाठी किवी फळ अवश्य खावे.
८.डोळ्यांसाठी उपयुक्त-
कीवी फळामध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त असणारा ल्युटिन नावाचा घटक असतो. रेटिना सुरक्षित ठेवणे, डोळ्यांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्याचे काम ल्युटिन करतो.
९.युरीन इन्फेक्शन होत नाही-
लघवीच्या जागेवर खाज किंवा जळजळ होत असल्यास किवी फळ खावे. तसेच किवीच्या नियमित सेवनाने युरीन इन्फेक्शन होत नाही.
१०.रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते-
कीवी फळामध्ये बायोअॅक्टिव्ह नावाचं कम्पाउंड रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
११.वजन कमी करण्यास उपयुक्त-
किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवी हे फळ रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच किवीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
👉क्राईमनामा Live टीप : या लेखातील माहिती हि सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून क्राईमनामा Live संपादकीय मंडळ या लेखाशी सहमत असतीलच असे नाही, तरी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
COMMENTS