आरोग्य टिप्स : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, सतत आजारी पडणे, थकवा जाणवणे, केस गळती, उदास वाटणे, चिडचिडेपण वाढणे, स्थूलता येणे...
आरोग्य टिप्स : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवणे, सतत आजारी पडणे, थकवा जाणवणे, केस गळती, उदास वाटणे, चिडचिडेपण वाढणे, स्थूलता येणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कोवळ्या ऊन्हाबरोबरच काही पदार्थांमध्येही व्हिटॅमिन डी आढळते.जाणून घ्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.
१.दूध-
दुधाला पूर्ण अन्न म्हणतात.
व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित दूध अवश्य प्यावे.
२.कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या
कॉड लीव्हर ऑईलच्या गोळ्या खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. मात्र याचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानेच करावे.
३.मशरुम-
मशरुम्समध्येही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. मशरूम खाल्याने 20 टक्के विटामिन डीची कमतरता भरुन निघते.
४.सोयाबीन दूध-
सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. ज्या लोकांना दूध आवडत नाही ते सोयाबीनचे दूध, सोयाबीन पनीर (टोफू) खाऊ शकतात.
५.संत्री-
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी सोबत कॅल्शियम देखील असते. विशेष म्हणजे डी व्हिटॅमिन शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.
६.गाजराचा रस-
गाजराच्या रसमध्येही व्हिटॅमिन सी आणि डी आढळते. गाजराचा रस नियमित पिल्याने रक्तही वाढते.
७.दही-
दह्यामध्ये प्रोटीन सोबतच व्हिटॅमिन डी देखील आढळून येते.
COMMENTS