आरोग्य टिप्स : फ्रिजमधील अति थंड पाणी पिल्याने होणारे आजार फ्रिजमधील अति थंड पाणी पिल्याने पचनशक्ती कमजोर होते. थंड पाणी पिल्याने पचनशक्ती...
आरोग्य टिप्स : फ्रिजमधील अति थंड पाणी पिल्याने होणारे आजार
फ्रिजमधील अति थंड पाणी पिल्याने पचनशक्ती कमजोर होते.
थंड पाणी पिल्याने पचनशक्तीवर परिणाम होतो. अन्न न पचता आतड्यांमध्ये अडकून राहतं.
त्यामुळे पोटाचे विकार होतात.
वारंवार थंड पाणी पित असाल तर तुमच्या शरीरातील तापमानात बदल होतो. ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके कमी होतात. तसेच सर्दीही होऊ शकते.
उन्हाळ्यात अचानक थंड पाणी पिण्यास सुरुवात केल्याने घसादुखी, ताप, डोकेदुखी, अॅसिडिटी जाणवते.
उन्हाळ्यात फ्रिजऐवजी प्या माठातील पाणी आणि आजारांपासून मिळवा मुक्तता
उन्हाळ्यात उन्हाचा ताप वाढला की थंड पाणी प्यावंसं वाटतं. मग अनेकजण फ्रीजमधील पाणी पितात. यामुळे सर्दी, खोकला, ताप याचा त्रास जाणवतो. याला उपाय म्हणून उन्हाळ्यात माठातील पाणी प्यावे. तज्ञ मंडळीही माठातील पाणी पिण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या माठातील पाणी पिण्याचे फायदे
१.पचनक्रिया सुधारते-
माठ मातीपासून बनवला जातो. त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात माठातील पाणी महत्वाची भूमिका बजावते.
२.घशाशी संबंधित आजार दूर ठेवते-
फ्रीजमधील पाणी प्यायले तर घशाशी संबंधित आजार होतात. परंतू माठातील पाणी प्यायला तर हे आजार दूर होतात. माठातील पाणी प्यायल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.
३.त्वचा चमकदार होते-
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी माठातील पाणी प्या. यामुळे रक्तशुद्धीकरण होईल. तसेच चेहरा तजेलदार राहील. रोज माठातील पाणी पिल्याने तुमचा चेहरा चमकदार दिसू लागेल.
४.पित्तनाशक-
माठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहते. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.
रोगप्रतिकारशक्ती वाढते-
माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासही मदत होते.
COMMENTS