मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील ...
मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील जांभळीपाडा भागात घडली आहे. जोगिंदर महतो (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे.
याप्रकरणी प्रेयसी कंचनदेवी (वय २५) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याचे कंचनदेवी महतो हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कंचनदेवीने गेल्या काही काळापासून पत्नीला सोडून तिच्याशी विवाह करण्याचा तगादा लावला हता. त्यासाठी ती सातत्याने दबाव टाकत होती. त्यामुळे जोगिंदरच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे तो नोव्हेंबर 2025 मध्ये गावी बिहारला निघून गेला होता.
कंचनदेवी नेहमीच जोगिंदरला फोन करून मुंबईत परत येण्याची आणि तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत होती. 19 डिसेंबरला जोगिंदर मुंबईत आला आणि 24 डिसेंबरला कंचनदेवीला भेटला. त्याने तिला समजावून सांगितले की त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. पण कंचनदेवी त्याचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. 1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या निमित्ताने कंचनदेवीने जोगिंदरला घरी बोलावले. जोगिंदर तिच्या घरी पोहोचल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि धारदार शस्त्राने त्याचे गुप्तांग कापले. जोगिंदर रक्तबंबाळ अवस्थेत तिथून बाहेर पडला. त्याच्या मुलांनी त्याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. त्याच्या जखमा गंभीर असल्याने त्याला सायन रुग्णालयात हलवले गेले. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती आहे.
दरम्यान, वाकोला पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून कंचनदेवीला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS