सोलापूर: बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध करीत मेहुण्याने दाजीची हत्या केल्याची घटना 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली...
सोलापूर: बार्शी तालुक्यात प्रेमविवाहाला विरोध करीत मेहुण्याने दाजीची हत्या केल्याची घटना 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुशील क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या दाजीचे नाव असून, ऋषिकेश क्षीरसागर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेशची बहीण रेश्मा यांचा एक वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र घरातील काही सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता. सुशील आणि रेश्मा हे कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. 23 जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी हे दोघे येरमाळा येथे आले होते. त्यानंतर 28 जानेवारी रोजी घरातील सदस्यांसह सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश हे जेवणासाठी पांगरीतील एका हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी सुशील आणि ऋषिकेश यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेल्यानंतर ऋषिकेशने सुशीलने दारूची बाटली फोडून सुशिलवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुशीलला तातडीने पांगरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पांगरी पोलिस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.
दरम्यान, प्रेमसंबंधातून झालेल्या बहिणीच्या लग्नाचा राग भावाच्या मनात होता, तोच राग धरून बहिणीला व तिच्या पतीला (मेहुणे) पांगरी (ता. बार्शी) गावाजवळील हॉटेलमध्ये जेवायला बोलावले. तिथे झालेल्या बाचाबाचीतून बाटली फोडून मेहुण्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी पांगरी पोलिसांनी ऋषीकेश मरिबा क्षीरसागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुशील दिलीप क्षीरसागर (रा. अरणगाव, ता. बार्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS