हिवाळा आला की त्वचेची खरी परीक्षा सुरू होते. मात्र, तुमच्या स्वयंपाकघरातच असा एक साधा घरगुती उपाय आहे, जो नियमित केल्यास त्वचा मऊ, तजेलदार...
हिवाळा आला की त्वचेची खरी परीक्षा सुरू होते. मात्र, तुमच्या स्वयंपाकघरातच असा एक साधा घरगुती उपाय आहे, जो नियमित केल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहू शकते.
हिवाळा आला की त्वचेची खरी परीक्षा सुरू होते.
थंड वारा, कमी आर्द्रता आणि गरम पाण्याचा वापर यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. अनेक जण महागड्या क्रीम्स वापरतात, पण त्याचा परिणाम लगेच दिसेलच असे नाही. मात्र, तुमच्या स्वयंपाकघरातच असा एक साधा घरगुती उपाय आहे, जो नियमित केल्यास त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेटेड राहू शकते.
हिवाळ्यात त्वचेतील नैसर्गिक ओलावा पटकन कमी होतो. गरम पाण्याने आंघोळ, साबणाचा जास्त वापर आणि पाणी कमी पिणे यामुळे समस्या वाढते. परिणामी त्वचा ताणलेली वाटते, पांढरे डाग पडतात आणि कधी कधी लालसरपणाही दिसतो.
या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे दही आणि मध. दह्यामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, तर मध त्वचेला खोलवर पोषण देतो.
- २ चमचे ताजे दही घ्या. त्यात १ चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहरा, हात किंवा कोरड्या भागावर लावा . १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय केल्यास फरक जाणवू लागतो.
- आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा
- भरपूर पाणी प्या
- खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा
- आहारात फळे आणि सुकामेवा समाविष्ट करा
हिवाळ्यात Dry Skin मुळे त्रास होत असेल तर घाबरायची गरज नाही. हा सोपा, स्वस्त आणि घरगुती उपाय नियमित केल्यास त्वचा पुन्हा एकदा मऊ आणि उजळ दिसू लागेल.


COMMENTS