संसदेमध्ये वंदे मातरम्वरील (Vande Mataram) चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. ९ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ...
संसदेमध्ये वंदे मातरम्वरील (Vande Mataram) चर्चेचा आज दुसरा दिवस आहे. ९ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभेत या चर्चेची सुरुवात केली, त्यानंतर देशात मोठा राजकीय वाद सुरू झाला.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या विषयावर भाषण केले. आज गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत वंदे मातरम्वरून विरोधकांवर निशाणा साधला.
गृहमंत्र्यांनी राज्यसभेत काय म्हटले?
अमित शाह म्हणाले, “वंदे मातरम्वर चर्चा करण्याची गरज तेव्हा होती, स्वातंत्र्य संग्रामातही होती, आजही आहे आणि 2047 मध्ये महान भारत घडेल तेव्हाही राहील.”
केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत काय सांगितले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार, “वंदे मातरम्ची पार्श्वभूमी ही शतकानुशतके इस्लामिक आक्रमण झेलून या देशाची संस्कृती क्षीण करण्याचा आणि इंग्रजांनी नवी संस्कृती लादण्याचा केलेल्या प्रयत्नांचा प्रतिकार आहे. त्यानंतरच बंकिम बाबूंनी याची रचना केली.”
ते पुढे म्हणाले, “मातृभूमीचे वंदन प्रभू श्रीरामांनीही केले, शंकराचार्यांनीही केले आणि चाणक्यांनीही केले. मातृभूमीपेक्षा मोठे काहीच नसते. हाच चिरंतन भाव बंकिम बाबूंनी पुनर्जीवित केला.”
नेहरूंवर निशाणा
पूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर टीका करत अमित शाह म्हणाले, “वंदे मातरमची सुवर्ण जयंती झाली तेव्हा नेहरूंनी याचे दोन तुकडे करून ते दोन अंतऱ्यांपर्यंत मर्यादित केले. तिथूनच तुष्टीकरणाची सुरुवात झाली. वंदे मातरम्चे तुकडे करून तुष्टीकरणाची सुरुवात झाली नसती तर देशाचे विभाजनही झाले नसते.”
अमित शाह पुढे म्हणाले, “वंदे मातरमचे (Vande Mataram) 100 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा वंदे मातरम् म्हणणाऱ्यांना इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) जेलमध्ये टाकले. आपत्काल लावला. विरोधी पक्षातील लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना जेलमध्ये भरले. वर्तमानपत्रांवर कुलुपे लावली. संपूर्ण देशाला कैदेत ठेवले.”


COMMENTS