चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...अन.! | CrimeNama
Loading ...

चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...अन.!

  उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील लहरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बस्तीपुरवा गावात राहणाऱ्या ...

 


उत्तर प्रदेशातील सीतापूर येथून प्रेमसंबंधाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील लहरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बस्तीपुरवा गावात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुण खुशीराम आणि 20 वर्षीय मोहिनी यांनी घरातून पळून जाऊन एकमेकांसोबत लग्न केलं होतं.

आश्चर्याची बाब म्हणजे, दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण लागत होते. कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे त्यांनी पळून जाऊन मंदिरात लग्न केलं. मात्र, याच प्रेमी युगुलासोबत एक भयानक घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.


झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह..


लग्न झाल्याच्या 22 दिवसांनंतर, खुशीराम आणि मोहिनी यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. झाडावर फासाला लटकलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घरातून पळून जाऊन केलं लग्न


खरं तर, दोघांचे मागील 3 वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. दोघे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण लागत असून देखील त्यांनी कुटुंबीय आणि समाजाची पर्वा न करता घरातून पळून जाऊन गावातीलच एका मंदिरात एकमेकांसोबत लग्न केलं. त्यानंतर, दोन्ही कुटुंबियांना हे लग्न मान्य करावं लागलं. पण, आता दोघांचे मृतदेह झाडावर फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. सध्या, पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

पोलिसांचा तपास


मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी) रात्री जेवण झाल्यानंतर दोघे झोपले. मात्र आज सकाळी ते दोघेही त्यांच्या खोलीत नव्हते. त्यानंतर, कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याबद्दल काहीच कळालं नाही. शेवटी, दोघांचे मृतदेह मंदिराजवळील एका झाडावर लटकल्याचे आढळून आलं. आता, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3753,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1226,Dhule,12,Entertainment,55,Gadchiroli,5,Health,450,India,546,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,296,Maharashtra,1701,Mumbai,410,Nagpur,49,Nashik,57,Politics,603,Pune,1870,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...अन.!
चुलत बहिणीशीच पळून जाऊन केलं लग्न! शेवटी, झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह...अन.!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAGSP08gLE8k6l9KhK8xYERZH11KHLoN7hUZQMyDg0N_2dk4LASsEHJu53NueXsjIVviCRy7zpp8N0h3Rhr-_aXBma3qXRmA7cO3YOmnhX8m1KoLXp86-j8Jj1j_ZJ40UAaLYxrqojiq6jHZiIxnc1LlyuZx2EXFeub9IgEuRWPuxYQkpPC7RYyYmD47I/s320/1001691364.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiAGSP08gLE8k6l9KhK8xYERZH11KHLoN7hUZQMyDg0N_2dk4LASsEHJu53NueXsjIVviCRy7zpp8N0h3Rhr-_aXBma3qXRmA7cO3YOmnhX8m1KoLXp86-j8Jj1j_ZJ40UAaLYxrqojiq6jHZiIxnc1LlyuZx2EXFeub9IgEuRWPuxYQkpPC7RYyYmD47I/s72-c/1001691364.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_608.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/blog-post_608.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content