छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने बिअर पाजून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला आहे.
पीडित महिला संबंधित लॉजवर आपल्या मित्राला भेटायला आली होती. पण तिने लॉजमधील चुकीच्या रुमचा दरवाजा ठोठावल्याने हा प्रकार घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने वेदांतनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. घनश्याम भाऊलाल राठोड (वय २७), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (वय २५, दोघेही रा. न्यू शांतिनिकेतन कॉलनी, जवाहर कॉलनी) आणि किरण लक्ष्मण राठोड (वय २५, रा. भानुदासनगर, जवाहर कॉलनी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित महिला (वय ३०) विवाहित असून घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी ती आपल्या मित्राला भेटायला गेली होती. तिला पैशांची गरज असल्याने तिने मित्राकडे पैसे मागितले होते. मित्राने तिला बुधवारी रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. बूक केलेल्या १०५ क्रमांकाच्या रूममध्ये दोघांनी मद्यप्राशन आणि जेवण केले. रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडिता फोनवर बोलत हॉटेलच्या बाहेर आली आली. फोनवर बोलून झाल्यानंतर ती परत आल्यावर तिने चुकून १०५ ऐवजी २०५ क्रमांकाच्या रूमचे दार ठोठावले. त्या रूममध्ये तिघेजण आधीपासून मद्यपान करत होते. तिघांनी तिला रूममध्ये ओढून दार लावून घेतले. त्यानंतर बळजबरीने तिला बिअर पाजून तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान पीडितेने आरोपींच्या तावडीतून सुटका करत दरवाजा उघडून आरडाओरड केली. त्यानंतर तिने थेट वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले.
आरोपी घनश्याम, ऋषिकेश, किरण तिघेही अविवाहित आहेत. दोघेजण एका फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतात. ऋषिकेश हा खाजगी काम करतो. त्याचे शिक्षणही सुरू आहे. सकाळी हॉटेलमधून पळून गेल्यानंतर आरोपींनी मोबाइल बंद करून ठेवले होते. हॉटेल बुकिंग करताना दिलेले नाव, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ३ तासांत जिन्सी, मोंढा आणि भानुदासनगर तिघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS