नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (वय १९) या युवकाची त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडील आणि भावांनी मिळून हत्या केली आहे. ...
नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (वय १९) या युवकाची त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या वडील आणि भावांनी मिळून हत्या केली आहे. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह केला.
या घटनेमुळे नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आंचलचे दोन्ही भाऊ आणि वडिलांना अटक केली आहे.
सक्षम ताटे याचा 1 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या चार दिवसापूर्वीच त्याच्यासोबत घात झाला. यावर बोलताना प्रेयसी आंचल हिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, आज तो नाहीये पण त्याच्या आठवणी माझ्या मनात नेहमी राहणार आहेत. सक्षमच्या वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. आम्ही लग्न करण्याचं ठरवले होते. माझ्या वडिलांचा कायम आदर करत आपण सर्वांची परवानगी लग्न करु, असा विश्वास तो मला द्यायचा, पण आमच्या प्रेमाबद्दल घरच्यांना समजल्यानंतर विरोध करत घात केला. माझ्यासाठी तो धर्म स्वीकारणार होता, असा धक्कादायक खुलासा आंचल हिने केला. आमचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने हे प्रेमसंबंध माझ्या घरच्यांना मान्य नव्हते.
सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचल हिने केली आहे. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड, साहील ठाकूर, सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आता आणखी मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर येत आहे. तेथे जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरीपासून दूर राहा, असे सांगितले. यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे याची आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली.


COMMENTS