माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. एका घराच्या मागे अतिशय गंभीर अवस्थेत एक नवजात अर्भक आढळून आल्याने सुरुवातीला संप...
माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना समोर आली आहे. एका घराच्या मागे अतिशय गंभीर अवस्थेत एक नवजात अर्भक आढळून आल्याने सुरुवातीला संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
बाळ कोणाचे आहे आणि ते तिथे कोणी टाकले याचा शोध घेताना पोलिसांच्या हाती जे धागेदोरे लागले, त्यांनी सर्वांनाच सुन्न केले आहे. पोलीस तपासात उघड झाले की, या बाळाची जन्मदाती माता केवळ 16 वर्षांची मुलगी असून, धक्कादायक म्हणजे तिचाच 14 वर्षांचा सख्खा भाऊ या बाळाचा पिता आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रमुख मोहम्मद सानी मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, रक्ताच्या नात्यातील अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले आहे. समाजाच्या भीतीने आणि लोकलाजेस्तव या अल्पवयीन मुलीने बाळाला घराच्या मागील भागात बेवारस सोडून दिले होते. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत 14 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून, सत्य बाहेर आणण्यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मलेशियाच्या कायद्यानुसार हा प्रकार अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणाची दोन प्रमुख कलमांखाली चौकशी सुरू असून त्यात बाळ बेवारस सोडणे आणि सख्ख्या नात्यात शारीरिक संबंध ठेवणे अशा आरोपांचा समावेश आहे. या गुन्ह्यांसाठी 6 ते 20 वर्षांपर्यंतच्या कारावासासह कोडे मारण्याची शिक्षा होऊ शकते. एका निष्पाप जिवाचे प्राण धोक्यात टाकल्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या अंगावर शहारे आणणाऱ्या प्रकरणामुळे सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे.


COMMENTS