सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं. | CrimeNama
Loading ...

सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं.

  नवी मुंबईत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचं नाटक करून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला जाळ्यात अडकवल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. खरं कर, प...

 


नवी मुंबईत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाचं नाटक करून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला जाळ्यात अडकवल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. खरं कर, पीडित तरुणाचं अपहरण करून त्याच्या नातेवाईकांकडे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑनलाइन मैत्रीपासून थेट खंडणीपर्यंत पोहोचली.


भेटण्याचं आमिष दाखवून अपहरण केलं अन्...


घटनेतील 15 वर्षीय पीडित मुलगा दहावीत शिक्षण घेत असून आरोपींनी खोटं इन्स्टाग्राम प्रोफाइल तयार करून स्वतःला मुलगी असल्याचं भासवलं आणि मुलाशी सतत मॅसेजद्वारे संवाद साधला. नंतर, आरोपीने पीडित तरुणासोबत प्रेमाचं नाटक करून त्याचा विश्वास संपादन केला. नंतर त्याला भेटण्याचं आमिष दाखवून त्याला कल्याण (पूर्व) भागातील नांदिवली परिसरात बोलवलं. मुलगा ॲपद्वारे बुक केलेल्या कारमधून त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा तिथे थांबलेल्या चार संशयितांनी त्याला बळजबरीने पकडलं आणि जवळच्या इमारतीतील एका खोलीत कैद करून ठेवलं.

व्हॉट्सॲपवरून तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी


अपहरणानंतर, संशयितांनी पीडिताच्या कुटुंबीयांना व्हॉट्सॲपवरून व्हॉइस मॅसेज पाठवून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर, कुटुंबियांनी तातडीने रबाळे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 च्या टीमने त्वरित कारवाई सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली आणि टेक्निकल तपासातून मुलाला नेणाऱ्या कारचा नंबर शोधला. त्यानंतर वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने नांदिवली येथे मुलाला सोडल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदिवलीतील राजाराम नगर भागातील साई आराधना अपार्टमेंटमधील खोली नंबर 1 वर छापा टाकला. तिथे पीडित मुलगा चारही आरोपींसोबत आढळला. पोलिसांनी मुलाची सुरक्षित सुटका केली आणि आरोपी प्रदीपकुमार जयस्वाल (24), विशाल पासी (19), चंदन मौर्या (19) आणि सत्यम यादव (19) यांना अटक केली. ही कारवाई अपहरणाच्या तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत पूर्ण झाली. न्यायालयाने आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,81,Amaravati,15,Aurangabad,36,Breakin,1,Breaking,3775,Buldhana,16,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1240,Dhule,12,Entertainment,56,Gadchiroli,5,Health,450,India,559,Jalgaon,31,Jalna,14,Kolhapur,25,Lifestyle,298,Maharashtra,1707,Mumbai,413,Nagpur,49,Nashik,57,Politics,606,Pune,1874,Raigad,24,Ratnagiri,19,Sangali,28,Satara,48,Sindhudurg,5,Solapur,42,Sport,65,Technology,33,World,67,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं.
सोशल मीडियावर ओळख, प्रेमाचं नाटक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याला जाळ्यात ओढलं.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxq64pIqe3UX2_WvP1Ch0ScPXLwTyXIOlfFqc_VaIM2hu2_5eE-qPmvZ74x3CiOrahiBj0dkyp2K5xlykw1f53tzxSANKXA2ZeuWYqj4spu9t16HaLrgwrjjYEOh3ntL02JflXk7h9roQ9Ux4CDS-QnwltXUd54GnhTQWVF3dJd3mghRGs_ozD__8xfaA/s320/1001699158.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxq64pIqe3UX2_WvP1Ch0ScPXLwTyXIOlfFqc_VaIM2hu2_5eE-qPmvZ74x3CiOrahiBj0dkyp2K5xlykw1f53tzxSANKXA2ZeuWYqj4spu9t16HaLrgwrjjYEOh3ntL02JflXk7h9roQ9Ux4CDS-QnwltXUd54GnhTQWVF3dJd3mghRGs_ozD__8xfaA/s72-c/1001699158.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/12/10_30.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/12/10_30.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content