उत्तर प्रदेशातील झांसी येथील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याच्या मुलाचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका मुलीसोबत अतिशय केलेलं गैरक...
उत्तर प्रदेशातील झांसी येथील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याच्या मुलाचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. त्याने एका मुलीसोबत अतिशय केलेलं गैरकृत्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.
या तरुणाचे नाव अमन अग्रवाल असून त्याचे वडील प्रसिद्ध सराफा आहेत असं म्हटलं जातं. त्याचा हा व्हिडीओ बार-रेस्टॉरंटमधील आहे. 36 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये, अमन अग्रवाल दोन युवतींसह रेस्टॉरंटमध्ये येतो आणि रिसेप्शनवर असलेल्या एका मुलीशी बोलत असतो. पण अचानक अमन त्या रिसेप्शनिस्टला फ्लाइंग किस देतो.
त्यानंतर लिफ्टकडे जाताना तो पुन्हा थांबतो आणि तिच्याकडे परत येतो. युवती घाबरून मागे सरकते, तरीही अमन तिला जबरदस्तीने मिठी मारतो आणि दोन वेळा गालांवर किस करतो. त्याच्यासोबत आलेल्या मुली हे सर्व पाहून हसताना दिसत आहेत. पण अचानक घडलेल्या या कृतीने रिसेप्शनिस्ट तरुणी मात्र काही क्षणासाठी गोंधळून गेलेली दिसत आहे.
या घटनेनंतर त्या मुलीने तिच्या सहकाऱ्यांना माहिती दिली आणि त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. अमन नशेत होता आणि नशेत त्याने हे केल्याचे मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने केलेलं हे गलिच्छ कृत्य सीसीटीव्हीतही कैद झालं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, अमनला ताब्यात घेतले. यासंदर्भात बोलताना, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे नाबाबाद पोलीस ठाण्याचे प्रमुख जे.पी. पाल यांनी सांगितले आहे. ही घटना नाबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बार-रेस्टॉरंटमध्ये घडली.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हे अश्लील कृत्य समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुलींसोबत हवं तसं वागण्याची या प्रसिद्ध वापाऱ्यांच्या,व्यावसायिकांच्या मुलांची हिंमत कशी होते?, हे असे कृत्य पुन्हा होणार नाही याची खबरदारी कोण घेणार? अशा अनेक कमेंट आणि प्रश्न सध्या नेटकरी विचारताना दिसत आहे.


COMMENTS