एका विवाहित जोडप्याने उत्सुकतेपोटी डीएनए चाचणी केली पण रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली. एका डीएनए टेस्टमुळे त्यांचं संपूर्ण ...
एका विवाहित जोडप्याने उत्सुकतेपोटी डीएनए चाचणी केली पण रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालीच जमीनच सरकली. एका डीएनए टेस्टमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदललं, याची माहिती महिलेने सोशल मीडियावर शेअर केलीय.
सोशल मीडियावर पोस्ट करत महिलेने म्हटलंय की, "मला लहानपणापासूनच माहिती होते की मी डोनर कनसिव्ह्ड चाइल्ड आहे, माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्यापासून काहीही लपवून ठेवलेले नाही. मी फक्त हा विचार केला की डीएनए टेस्टमुळे आपल्या मूळ गोष्टींबाबत अधिक माहिती समजेल. पण रिपोर्ट पाहिल्यानंतर पूर्णपणे सुन्न झाले. तिचा डीएनए तिच्याच पतीशी जुळल्याची धक्कादायक माहिती अहवालाद्वारे समोर आली. सुरुवातीला ही प्रयोगशाळेची चूक असू शकते, असे तिला वाटले. पण पुन्हा चाचणी केल्यानंतर आणखी एक धक्कादायक सत्य समोर आलं. तिचे सासरेच स्पर्म डोनर होते, ज्याद्वारे महिलेचा जन्म झाला होता. म्हणजे महिला आणि तिचा पती जैविकदृष्ट्या सावत्र भावंडे आहेत.
'एका सत्यामुळे सर्व काही बदललं...'
महिलेने पुढे असंही म्हटलंय की, माझ्या पतीवर माझं खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांच्या सोबतीने खूप चांगलं आयुष्य निर्माण केलंय आणि आम्हाला दोन मुलंही आहेत. पण या एका सत्याने सर्व काही बदललंय. असं वाटतंय की आमची संपूर्ण ओळख बदललीय. आम्ही दोघंही अनुवांशिक सल्लागाराचा (genetic counselor) सल्ला घेत आहेत आणि हे सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय.

COMMENTS