पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एका युवकाने आपल्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादाय...
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एका युवकाने आपल्या सख्या चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भावाचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
अजय पंडित असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. अशोक पंडित असे आरोपी चुलत भावाचे नाव असून, त्याला पिंपरी चिंचवडमधून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंडित आणि आरोपी अशोक पंडित हे दोघेही चुलत भाऊ आहेत. ते मूळचे झारखंड राज्यातील रहिवासी आहेत. कामानिमित्त दोघंही पुण्यात वास्तव्याला आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून अशोकने अजयची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी अशोक पंडित याने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. अजयचा मृतदेह त्याने एका पोत्यात भरला आणि ते पोतं भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे आणून फेकून दिले. स्थानिक नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पुणे पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच तातडीने तपासाची चक्रं फिरवली. मृतदेह आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत आरोपी अशोक पंडित याचा माग काढला. अखेरीस, आरोपी अशोक पंडित याला पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून अटक केली. त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS