मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या...
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असून त्या डॉक्टर होत्या. ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पण अवघ्या ९ महिन्यातच त्यांचा संसार मोडला आहे.
अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा ७ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी सात वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळी बीडीडी येथे गौरी रहात होत्या, त्या केईएम रुग्णालय डेटिस विभागात कार्यरत होत्या.
अनंत गर्जे यांच्या पत्नीने शनिवारी (ता. 22) रात्री आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे. पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांच्या लग्नाला देखील पंकजा मुंडे आपली बहीण प्रीतम मुंडेंसह गेल्या होत्या, मोठ्या थाटामाटात ७ फेब्रुवारीला लग्न झाले होते. परंतु, त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचलले याची चर्चा सुरू आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे, तर अनंत गर्जे यांचे प्रेमसंबंध असल्याने गौरी गर्जे या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे, कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे, अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु आहे.


COMMENTS