गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...
गुवाहाटी (आसाम): आसाममधील महिला पत्रकार रितुमोनी रॉय (वय २७) हिचा मृतदेह न्यूजरुममध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
धक्कादायक म्हणजे तिच्या लग्नाला अवघे १५ दिवस बाकी होते.
रितुमोनी रॉय गुवाहाटी येथील रहिवासी होती, परंतु कुटुंबापासून ती वेगळी राहत होती. ‘सच द रियलिटी’ या डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये ती अँकर आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत होती. यापूर्वी तिने ‘प्रथम खबर’, ‘ईशान न्यूज’ आणि इतर अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर काम केले होते. ५ डिसेंबर रोजी रितुमोनी आणि देबाशीष बोरा यांचे लग्न होणार होते. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. २३ नोव्हेंबर रोजी रविवारी ती एका मैत्रिणीच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. तिथेही ती हसत-खेळत होती, नाचत होती आणि मेहंदीचा कार्यक्रमही झाला होता.
मित्रांनी सांगितले की, त्या दिवशी ती खूप आनंदी दिसत होती. लग्नाचे फोटो शेअर करत होती. मात्र संध्याकाळी ती ऑफिसला गेली आणि त्यानंतर घरी परतलीच नाही. देबाशीष यांनी रात्रभर फोन केले, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, ते स्वतः २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी तिचे सहकारी ऑफिसला पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. जबरदस्तीने उघडल्यावर त्यांना रितुमोनी छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून धक्का बसला.
दिसपूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणाले की, ‘प्राथमिक तपासात ही आत्महत्या वाटत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. घटनास्थळावरून एक छोटी सुसाइड नोट मिळाली, ज्यात लिहिले होते: “हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. क्षमा करा.’ फॉरेन्सिक टीमने नोट लॅबमध्ये पाठवली आहे, जेणेकरून हस्ताक्षराची पुष्टी होऊ शकेल. सर्व बाजूनी तपास सुरू असून, अहवाल हाती आल्यानंतर कारण समजू शकेल.
मालक शुभम अग्रवाल यांनी फोनवर सांगितले की, ‘माझ्या फोनवरून लाईव्ह सीसीटीव्ही चेक केला. रितुमोनी रात्री नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये शिरली, बॅग ठेवली, कॉम्प्युटरवर काम सुरु केले. मग एक प्लास्टिकची खुर्ची मेजावर ठेवली, शालीने गळफास बनवला आणि… सुरुवातीला ती खूप वेळ तडफडली, संघर्ष करत राहिली, पण शेवटी…” हे पाहणे अत्यंत क्लेशदायक असल्याचे शुभम म्हणाले.


COMMENTS