मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरातून (Crime News) एक अत्यंत निर्दयी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका आईने केवळ पैशांसाठी आपल्या अल्पवयीन (Mu...
मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरातून (Crime News) एक अत्यंत निर्दयी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका आईने केवळ पैशांसाठी आपल्या अल्पवयीन (Mumbai Crime) मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे.
पीडित मुलीने आपल्या वर्गशिक्षिकेकडे घडलेली भयानक घटना सांगितल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता (नाव बदललेले) ही घाटकोपर परिसरातील एका नामांकित शाळेत 10 वीच्या वर्गात शिकते. श्वेता आणि तिची आई मालती (नाव बदललेले) एकाच घरात राहायच्या. मालतीला पैशांची मोठी चणचण होती. या आर्थिक गरजेतूनच तिने श्वेताला शेजारच्या व्यक्तीच्या तावडीत दिले. पैसे मिळवण्यासाठी मालती दररोज श्वेताला शेजारील व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होती.
श्वेता वारंवार या कृत्याला विरोध करायची, त्यांच्याशी भांडायची, पण प्रत्येक वेळी तिला धमकावून गप्प बसवले जायचे. परिस्थिती खूपच वाईट झाल्यामुळे एके दिवशी कंटाळून तिने घरातून पळून जाऊन मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला. आपला त्रास थांबेल या आशेने ती तीन दिवस तिथे लपून राहिली. मात्र, जेव्हा ती घरी परतली, तेव्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार सुरू झाले. इतकेच नाही तर तिची आई आणि शेजारी तिला पैशांसाठी इतरांकडेही पाठवू लागले.
या सर्व त्रासाला कंटाळून एका दिवशी वर्गात असताना श्वेता ढसाढसा रडू लागली. वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन आपुलकीने विचारणा केली. तेव्हा श्वेताने आपल्यावर होणाऱ्या या भयानक अत्याचाराबद्दल सर्व हकीकत शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी तात्काळ तिला सुरक्षित ठिकाणी नेले आणि शाळा प्रशासनाला माहिती दिली. शाळा प्रशासनाने त्वरित पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMENTS