शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ज्याचा सध्या संपूर्ण राज्...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ज्याचा सध्या संपूर्ण राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. या जमीन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे.
अस असताना, पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल नाही.
Parth Pawar Land Scam Pune: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार याच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. ज्याचा सध्या संपूर्ण राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. या जमीन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे. अस असताना, पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवारांवर अद्यापही गुन्हा दाखल नाही.
शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्रांक शुल्क संगनमत करुन बुडल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे (Digvijay Patil) व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला आहे. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, परंतु, फक्त एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने ४८ तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार झाला.
दरम्यान, या आरोपांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार काय म्हणाले ते पाहूया.
राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हानिहाय बैठका सुरु आहेत. जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. कोणी चुकीचं काही करत असेल त्याला माझा पाठिंबा नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. तर मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी; त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार म्हणाले.


COMMENTS