मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवार...
मुंबईः राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नी गौरी पालवे-गर्जे (वय 28) यांनी शनिवारी (ता. २२) संध्याकाळी वरळीच्या आदर्श नगर येथील 'महाराष्ट्र मल्टी युनिट रेसिडेन्शियल सोसायटी'मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा थाटामाटात विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर अनंत गर्जे यांच्या दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरी पालवे यांना समजले होते. त्यामुळे अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांच्यात भांडणे व्हायची. याच वादातून गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गौरी पालवे यांचे पती अनंत गर्जे, दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वरळी पोलिसांनी रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे याला अटक करण्यात आली आहे.
मागील महिन्यात 3 ऑक्टोबर रोजी अनंतच्या वाढदिवसानिमित्ताने आई-वडिलांनी काहीही न कळवता अचानक घरी गेले होते. तेव्हा, गौरी हिच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर मारल्याचे व्रण दिसले. आई-वडिलांना पाहून ती घाबरली. तुम्ही जा, असं ती सांगत होती, त्यावेळी आई-वडिलांना संशय आल्यानंतर त्यांनी लेकीकडे विचारपूस केली होती.
अनंत गर्जे याने छोट्या छोट्या कारणातून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात, घराच्या शिफ्टिंगदरम्यान हाती लागलेल्या कागदपत्राने तिच्या पायाखालची जमीन सरकली. 2021 रोजीचे लातूरच्या एका गर्भवती महिलेचे संमतीपत्र आणि जाहीरनामा होता. त्यात, महिलेच्या पतीचे नाव अनंत गर्जे असे नमूद होते. त्यामुळे अनंतने आपल्याला धोका दिला आहे, असा संशय गौरी यांना होता.
अनंतकडे या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने याबाबत तुला काय करायचे ते कर, मी कोणाला घाबरत नाही, याबाबत कोणाला सांगितलं तर, तुझं नाव चिठीत लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे तिने आई – वडिलांना सांगितले. त्याने मारहाण केल्याचेही गौरीने सांगितले होते.
दरम्यान, दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडे सहा ते पावणे सातच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


COMMENTS