मालेगावच्या डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पीडित चिमुकलीच्या आईनं...
मालेगावच्या डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेला लैंगिक अत्याचार आणि तिची निर्घृण हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पीडित चिमुकलीच्या आईनं मन सून्न करणारा घटनाक्रम सांगितला आहे.
त्या दिवशी नेमकं त्या चिमुकलीसोबत काय झालं? प्रकरण कसं उघडकीस आलं? हे जाणून घेऊया...
3 वर्षाची ती चिमुकली तिच्यावर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. दगडाने ठेचून ठेचून तिला किडा-मुंग्यांसारखं त्या नराधमाने मारून टाकलं. आणि या घटनेचा बनाव देखील त्यानेच केला. तिच्याच घराच्या अंगणातून तो तिला कसा घेऊन गेला, हा घटनाक्रम आता त्या चिमुकलीच्याच आईने सांगितला आहे. एका आईला आपल्या मुलीसोबत त्या दिवशी काय झालं हे सांगताना काय वेदना आणि दुःख होत असेल, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. त्या चिमुरडीसोबत त्या दिवशी काय झालं आणि प्रकरणाला वाचा कशी फुटली.
त्यानं कॅडबरी दिली आणि समोर आलं नराधमाचं कांड
चिमुकलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, चिमुकली घराच्या अंगणात खेळात होती. तुला कॅडबरी देतो, असं सांगून नराधम विजय खैरनार तिला घेऊन गेला. पुढे तिला एका दुकानावर त्याने तिला कॅडबरी घेऊन दिली आणि नंतर टॉवरजवळच्या झुडुपात नेऊन तिच्या अब्रुचे लचके तोडले. अत्याचारांतर नराधम तिथंच थांबला नाही तर त्यानं हे पाप लपवण्यासाठी तिची दगडाने ठेचून ठेचून तिची निर्घृण हत्या केली. तिचा मृतदेह त्याच झुडुपात तसाच फेकून दिला आणि तो गावात घरी निघून गेला.
बराच वेळ झाला...चिमुरडी कुठे दिसत नाही म्हणून आईनं तिचा शोधाशोध सुरू केला. गावकरी आणि तिच्या आई-वडिलांनी मिळून आख्ख गाव पिंजून काढण्यात आलं. पण चिमुरडीचा काही पत्ता लागला नाही. तिच्यासोबत खेळत असलेल्या बारक्या मुलांनी नराधमाला तिला कॅडबरी देतो म्हणून घेऊन गेल्याच सांगितलं. त्या चिमुरडीच्या पालकांनी लगेचच त्याच्या घरी जाऊन विचारणा केली. मी तिला कॅडबरी देऊन दुकानाच्या इथेच सोडल्याचं त्या नराधमाने सांगितलं. त्यानं स्वतः तिची हत्या केली तरीही त्याने त्या शोधात सहभागी होऊन तिला शोधण्याचं ढोंग केलं.. तिचा फोटो तिच्या घरच्यांकडून मागून घेतला. पोलिसांच्या तपासाला देखील तो योग्य पद्धतीने सहकार्य करत तिला शोधण्याचं नाटक करत होता.
पण लहान मुलांच्या जबाबावरून आणि तिच्यासोबत आरोपीलाच शेवटचं पाहिलं असल्याचं समोर आलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच सर्व प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे त्या चिमुरडीला दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करून देखील नराधम हा चिमुकलीचा शोध घेत होता.
चिमुकलीची चूक तरी काय?
काय चूक असेल त्या 3 वर्षाच्या चिमुकलीची जिचा जीव अशा नराधमामुळे गेला? काय चूक असेल त्या आई-वडिलांची जे आज हे दिवस पाहत आहेत? त्याची मुलगी फक्त अंगणात दिवसा खेळत होती.आणि हे सर्व सांगताना त्यांची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना देखील करू शकणार नाही.
दरम्यान, नराधम विजय खैरनार याला फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मालेगावच्या रस्त्यावर जनसागर उसळला आहे. जनआक्रोश मोर्चात महिला व मुलींचा आक्रोश, तरुणांचा संताप या प्रकरणाची दाहकता किती आहे.


COMMENTS