सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर...
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे.
साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
साक्षी सुरेश मैलापुरे (वय २५, रा. जुळे सोलापूर, आयएमएस शाळेजवळ) हिने मंगळवारी (ता. ७) दुपारी १२च्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला स्कार्फच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षीने गळफास घेतल्याचे सुरुवातीला आईला दिसले. त्यानंतर तत्काळ तिला नातेवाइकांच्या साहाय्याने फासातून सोडवून शासकीय शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी ही अभ्यासात हुशार होती. तिने एवढ्या कमी वयात असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अनेक तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS