"लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. सप्टेंबर महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास ...
"लाडकी बहीण" योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी. सप्टेंबर महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता दिला गेला आहे.
पण आता ही योजना अधिकच पारदर्शकतेसाठी एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या योजनेत होणारे गैरप्रकार आणि बोगस लाभार्थांची घुसखोरी थांबवण्यासाठी राज्य सरकारने सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ्यात ज्या महिलांनी e-KYC केलं नाही त्यांना हा हप्ता मिळणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. त्यानंतर कालपासून शुक्रवारी ११ तारखेपासून सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. परंतु ज्या महिलांनी e-KYC केली नाही त्या महिलांच्याही खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. पण याचा अर्थ असा नाही की, e-KYC करावी लागणार नाही. २ महिन्याची मुदत संपायच्या आधीच e-KYC करावी लागणार आहे. नाही तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
केवायसी करताना अडचणी येत आहेत मान्य आहे. पण सुरुवातीला ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती. त्याचा अनेकांनी फायदा घेतला. परंतु, आता हा निधी त्याच लाडक्या बहिणींना मिळेल जी पात्र लाभार्थी असेल. त्यासाठी आपण केवायसी करतोय. फार फार तर आपण मुदत वाढवायची असेल तर करु. पण केवायसी ही करावीच लागणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया करताना लाभार्थीच्या वडिलांचे आणि पतीचे वार्षिक उत्पन्नदेखील तपासले जाणार आहे. जर तुम्ही KYC करायचा विचार करत असाल तर त्या वेबसाईटची पडताळणी करूनच केवायसी करा. कारण एक बोगस वेबसाईट समोर आली आहे. ही सरकारची वेबसाईट नसून फेक साईट आहे. त्यामुळे यावर कुणीही चुकून केवायसी करू नका. लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आली आहे. आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc वरून करावी, असे आवाहन केले जात आहे.
COMMENTS