HIV ची लक्षणे, कारणे, निदान व उपचार, सर्वकाही घ्या जाणून. | CrimeNama
Loading ...

HIV ची लक्षणे, कारणे, निदान व उपचार, सर्वकाही घ्या जाणून.

एचआयव्ही हा एक व्हायरस असून तो मानवी रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवत असतो. त्यामुळे या व्हायरसला Human Immunodeficiency Virus अर्थात HIV अ...



एचआयव्ही हा एक व्हायरस असून तो मानवी रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवत असतो. त्यामुळे या व्हायरसला Human Immunodeficiency Virus अर्थात HIV असे म्हणतात. रोगप्रतिकारक शक्तीमुळे (immune system मुळे) वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून आपल्या शरीराचे रक्षण होण्यास मदत होत असते.

मात्र HIV व्हायरसमुळे ही रोगप्रतिकारक शक्ती धोक्यात येत असते. HIV व्हायरस हे immune system मधील CD4 पेशींवर हमला करतात व CD4 पेशींना नष्ट करत असतात.


HIV विषाणू बाधित रक्त, वीर्य, योनिस्त्राव, गुदातील द्रव, एचआयव्ही बाधित आईचे दूध यांद्वारे एचआयव्ही व्हायरसची लागण दुसऱ्या व्यक्तीमध्ये होत असते.


एचआयव्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित यौनसंबंध (सेक्स), एचआयव्ही बाधित व्यक्तीचे रक्त किंवा अशा व्यक्तींसाठी वापरलेल्या ब्लेड, सुया, इंजेक्शन किंवा टॅटूची साधने यांच्या माध्यमातून एचआयव्हीची दुसऱ्यांना लागण होत असते. याबरोबरच एचआयव्ही बाधित गरोदर स्रीद्वारे होणाऱ्या बाळालाही एचआयव्हीची लागण होत असते.


HIV बाधित व्यक्तीशी व्यवहार केल्याने, त्याच्याशी बोलणे, त्याला स्पर्श करणे यामुळे एचआयव्हीची लागण होत नाही.


एचआयव्ही बाधित व्यक्तीबरोबर राहणे, एकत्रित जेवण खाणे यामुळेही व्हायरस दुसऱ्यामध्ये पसरत नाही.


एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेद्वारे हवेत विषाणू पसरत नाहीत.


डास किंवा इतर कीटक चावल्यामुळेही HIV चे विषाणू पसरत नाहीत.


HIV ची लागण झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट, HIV antigen test, CD4 count, ELISA test करण्यात येतात.


HIV ची लागण झाल्यानंतर साधारण 23 ते 90 दिवसामध्ये HIV च्या antibodies त्या व्यक्तीच्या शरीरात तयार होत आतात. म्हणजे एचआयव्ही बाधित व्यक्तीशी असुरक्षित सेक्स केल्यास किंवा एचआयव्ही बाधित रक्तातून संक्रमण झाल्यास पुढील 23 ते 90 दिवसांमध्ये HIV वायरस असल्याचे टेस्टमधून दिसून येऊ शकते.


त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध घडले असल्यास लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट करून HIV ची लागण झाली आहे की नाही हे ठरवता येणार नाही. HIV च्या antibodies शरीरात तयार न झाल्यामुळे टेस्ट निगेटिव्ह येत असते. त्यामुळे 2 ते 3 महिन्यांनी टेस्ट करणे आवश्यक असते. या टेस्टच्या आधारेच HIV ची लागण झाली आहे की नाही निश्चित होत असते.


एचआयव्ही व्हायरसच्या संपर्कात आल्यापासून एक ते दोन महिन्यात सुरवातीला ताप येणे, हुडहुडी भरणे, लिम्फ नोड्स सुजणे, त्वचेवर पुरळ येणे, अंगदुखी, अतिसार अशी काही लक्षणे जाणवू शकतात.


HIV ची लागण झाल्यानंतर पुढीलप्रमाणे लक्षणे जाणवू शकतात.


वारंवार ताप, सर्दी, खोकला असे आजार होणे,

लाळग्रंथी सुजणे (लिम्फ नोड्स सुजणे),

अंगदुखी व डोकेदुखी,

त्वचेवर लालसर रंगाचे पुरळ येणे,

तोंडात व घशात फोड येणे,

घसा खवखवणे,

मळमळ,

एक महिन्याहून अधिक दिवस पातळ अतिसार होणे,

रात्री झोपेत घाम येणे,

भूक कमी होणे,

वजन कमी होत जाणे,

अशक्तपणा,

मांसपेशी दुर्बल होणे अशी HIV मध्ये लक्षणे असतात.

HIV विषाणूंना नष्ट करणारे इलाज अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र अँटीरेट्रोव्हायरल औषधांच्या उपचाराने एचआयव्ही व्हायरससह अनेक वर्षे बाधित रुग्णाला जगता येणे शक्य आहे. त्यामुळे HIV ची लागण झाली म्हणजे सर्व काही संपले, असे रुग्णाने समजू नये. HIV व्हायरसवरील औषधोपचार चालू ठेवल्यास अनेक वर्षे व्यवस्थित जगता येते.


मात्र HIV ची लागण झालेली असल्यास आणि रुग्णाने त्यावर उपचार न घेतल्यास पुढे गंभीर स्थिती निर्माण होते. त्या स्थितीला AIDS असे म्हणतात. एड्सच्या स्थितीमध्ये इम्युन सिस्टीम ही खूपच कमजोर बनते. अशावेळी एड्सचा रुग्ण हा साधारण 3 वर्षापर्यंत जगू शकतो. त्यामुळे HIV विषाणूची लागण झालेली असल्यास समाज काय म्हणेल याची चिंता न करता त्यावर वेळीच उपचार चालू करावेत. उपचाराविषयी अधिक माहिती जवळच्या सरकारी दवाखान्यात मिळेल.

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,78,Amaravati,14,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,3477,Buldhana,15,Chandrapur,1,Cooking,2,Crime,1005,Dhule,12,Entertainment,54,Gadchiroli,5,Health,449,India,426,Jalgaon,29,Jalna,13,Kolhapur,21,Lifestyle,286,Maharashtra,1613,Mumbai,388,Nagpur,39,Nashik,53,Politics,587,Pune,1816,Raigad,23,Ratnagiri,19,Sangali,27,Satara,45,Sindhudurg,5,Solapur,35,Sport,64,Technology,33,World,64,पुणे,2,महाराष्ट्र,2,
ltr
item
CrimeNama: HIV ची लक्षणे, कारणे, निदान व उपचार, सर्वकाही घ्या जाणून.
HIV ची लक्षणे, कारणे, निदान व उपचार, सर्वकाही घ्या जाणून.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjk10XN71OCkAI-1cMX-q04l5md3zNJ7Hlz_c8HSsg_mmswI7T6YbTQL4rid1QhLiYCfcfIYyyVFXaG_Ju7vPCTKuDu8y9lPCEVVMipZkk-CCNzqPEOzAvaRH-frRZIYa4GNDeTMHAgk6kNm7ZReyQ_eY6CrGgjCuY_91kR-Bu6AVAy-OjwX6v1e3vImCI/s320/1001430756.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjk10XN71OCkAI-1cMX-q04l5md3zNJ7Hlz_c8HSsg_mmswI7T6YbTQL4rid1QhLiYCfcfIYyyVFXaG_Ju7vPCTKuDu8y9lPCEVVMipZkk-CCNzqPEOzAvaRH-frRZIYa4GNDeTMHAgk6kNm7ZReyQ_eY6CrGgjCuY_91kR-Bu6AVAy-OjwX6v1e3vImCI/s72-c/1001430756.jpg
CrimeNama
https://www.crimenama.com/2025/10/hiv.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2025/10/hiv.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content