अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. सेवेत असताना ज्यांनी प्राण गमवाला अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आली होती. त्यांना दिलासा देण्याचा काम ...
अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. सेवेत असताना ज्यांनी प्राण गमवाला अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आली होती. त्यांना दिलासा देण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अनुकंपा तत्वाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता.
कायद्याच्या अनेक अडचणीत होत्या, पण ४२ GR रद्द करून एक GR केलं आणि अडचणी सोडवून १० हजार पेक्षा जास्त लोकांना आज नियुक्ती दिल्या, असा जयकुमार गोरे म्हणाले.
Jaykumar Gore: मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आज अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आज (४ ऑक्टोबर) रोजी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मंत्री दादा भुसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना, अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. सेवेत असताना ज्यांनी प्राण गमवाला अशा लोकांचे कुटुंब उघड्यावर आली होती. त्यांना दिलासा देण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अनुकंपा तत्वाचा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता. कायद्याच्या अनेक अडचणीत होत्या, पण ४२ GR रद्द करून एक GR केलं आणि अडचणी सोडवून १० हजार पेक्षा जास्त लोकांना आज नियुक्ती दिल्या, असा जयकुमार गोरे म्हणाले.
तर राज्यातील अतिवृष्टी बद्दल बोलताना, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामा काम युद्ध पातळीवर सुरु आहे, लाखो हेक्टर नुकसान झालं आहे. पाच ते सहा दिवसात हे पंचनामे पूर्ण होतील. राज्य सरकार लवकरच विशेष पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर करेल. बाधित आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करेल, असा जयकुमार गोरे म्हणाले.


COMMENTS