नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील मदनगीर परिसरात राहात असलेल्या दिनेश (वय २८) यांच्यावर त्यांच्या पत्नीने झोपेत असताना उकळते तेल ओतले आणि जखमांवर...
नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील मदनगीर परिसरात राहात असलेल्या दिनेश (वय २८) यांच्यावर त्यांच्या पत्नीने झोपेत असताना उकळते तेल ओतले आणि जखमांवर मिरची पूड टाकली. या हल्ल्यात दिनेश गंभीररीत्या जखमी झाला असून सध्या ते सफदरजंग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीने रात्री झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले आणि नंतर त्याच्या जखमांवर तिखट टाकले. औषध कंपनीतील कर्मचारी दिनेश (२८) याला २ ऑक्टोबरच्या रात्री गंभीर भाजलेल्या अवस्थेत सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. त्याच्या शरीराचा २० टक्के भाग भाजला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
त्याच दिवशी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, पहाटे तीनच्या सुमारास दिनेश झोपलेला असताना, त्याची पत्नी साधनाने त्याच्यावर गरम तेल ओतले. यावेळी जोडप्याची आठ वर्षाची मुलगीही घरी होती.
दिनेशने पोलिसांना सांगितले की, दिनेश २ ऑक्टोबर रोजी कामावरून घरी आल्यानंतर कुटुंबियांसोबत जेवण केले आणि झोपला. पत्नी आणि मुलगी (वय ७) जवळच झोपल्या होत्या. दिनेशच्या पत्नीने पहाटे ३:१५ च्या सुमारास उकळते तेल ओतले आणि भाजलेल्या जागेवर तिखट टाकले. त्याने विरोध केला, तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तू आवाज केलास तर मी आणखी गरम तेल ओतेन. जळजळ आणि वेदनेने तो ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने शेजारी आणि तळमजल्यावर राहणारे घरमालक धावले आणि दिनेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दिनेश आणि त्यांची पत्नी यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. दोन वर्षांपूर्वी पत्नीने क्राइम अगेंस्ट वुमन सेल मध्येही तक्रार दिली होती, मात्र नंतर समुपदेशनानंतर वाद काही काळ मिटला होता. दरम्यान, सध्या आरोपी पत्नी फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. या संपूर्ण घटनेने मदनगीर परिसरात तसेच दक्षिण दिल्लीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS