जालना: जालना शहरातील बस स्थानक परिसरातील शिवनेरी लॉजवर एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी...
जालना: जालना शहरातील बस स्थानक परिसरातील शिवनेरी लॉजवर एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
सोमवारी (ता. २०) रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवनेरी लॉजवर एका वृद्धाचा मृतदेह आढळल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी व्यापारी मृत अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे आढळून आली. त्यानुसार मृताचे नाव विश्वनाथ भानुदास रोडे (वय ७५, रा. लातूर शहर) असल्याचे समोर आले आहे.
मृत व्यापारी हे व्यापाराच्या संदर्भात कापड खरेदीसाठी ते नेहमी जालना शहरात येत-जात असत. त्यामुळे त्याची जालन्यात चांगली व्यापारी ओळख होती आणि याच कारणामुळे तो शिवनेरी लॉजवर मुक्कामी राहिले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या व्यापाऱ्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS