नवी दिल्ली : एका युवकाने घटस्फोट घेतल्यानंतर आनंद साजरा करत संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर ...
नवी दिल्ली : एका युवकाने घटस्फोट घेतल्यानंतर आनंद साजरा करत संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. नेटिझन्स व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
युवकाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक युवक आपल्या आईकडून दूधाने स्नान (अभिषेक) करताना दिसत आहे. त्यानंतर 'सुखी घटस्फोट' असा लिहिलेला केक कापून जंगी सेलिब्रेशन करताना दिसतो. संबंधित व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे. काहींनी या कृतीवर टीका केली असली, तरी काहींनी युवकाच्या 'नव्या सुरुवातीचा' आनंद साजरा करण्याच्या पद्धतीचे कौतुकही केले आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की युवकाची आई त्याच्यावर दूध ओतून त्याचा अभिषेक करत आहे. हिंदू संस्कृतीत अभिषेक हा शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानंतर युवक 'सुखी घटस्फोट' असे लिहिलेल्या चॉकलेट केकजवळ येतो आणि हसतमुखाने तो केक कापतो. केकवरच त्याने लिहिले होते की, "मी माझ्या माजी पत्नीला १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत." तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "कृपया आनंदी रहा, स्वतःचा सन्मान करा. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये दिले आहेत, घेतले नाहीत. आता मी सिंगल, खुश आणि आजाद आहे. माझं जीवन, माझे नियम!"
संबंधित व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादानंतर युवकाने तो पुन्हा शेअर करत आपल्या समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले. जरी या व्हिडिओवर टीका आणि वेगवेगळ्या चर्चेचा पाऊस पडत असला, तरी त्याने घटस्फोटानंतरही आयुष्य नव्या दृष्टीने कसं पाहता येऊ शकते याबाबत एक वेगळा विचार नक्कीच पुढे आणला आहे.
COMMENTS